Skip Navigation Links

परिसरातील प्रेक्षणीय स्थळे


या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे लपलेली आहेत. नैसर्गिक सौदर्याने नटलेली
डोंगरे, लेण्या आणि ऐतिहासिक महत्व असलेली अनेक ठिकाणे परीसरामद्धे पाहायला मिळतात.

   अजिंठा

महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातील चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यापैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली बाघ येथली लेणी. अजिंठाच्या लेण्यांना तर वैश्विक ठेव्यात स्थान मिळाले आहे.

ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर जॉन स्मिथ हा दि.28 एप्रिल 1819 रोजी अजिंठाच्या जंगलात शिकारीसाठी गेला असता त्यास लेणी क्र.10 नजरेस पडली ह्याचा दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आली. जॉन स्मिथ याची सही व वरील दिनांकाचा उल्लेख लेणी क्र 10 मधील एका स्तंभांवर आढळतो . महाराष्ट्रातील गुफांना ख्रिस्तपूवॆ दुसऱ्या शतकापासूनचा इतिहास आहे. सह्याद्री डोंगररांगाच्या कुशीत वसलेल्या या गुफापर्यंत पोहोचणे आजही दुर्गम वाटत असले तरी निरनिराळ्या धर्माच्या भिक्षुकांचे ते वसतीस्थान होते, हे विसरून चालणार नाही.अजिंठामधील रंगीत चित्रे, वेरूळमधील मूती आणि एलिफांटा गुफांमधील दैवी अवशेष पाहुन पर्यटक अगदी मंत्रमुघ्ध होऊन जातात. सुवर्णयुगाचा वारसा अजिंठा वेरुळच्या गुांफा अजिंठा-वेरुळच्या लेण्या म्हणजे महाराष्ट्राची गौरवस्थाने! पाषाणातून कोरून काढलेल्या या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. कित्येक शतकापूर्वी भारतीय कारागिरांनी मिळवीलेले कौशल्य आजण त्यांना लाभलेली सौन्दयॅदृष्टी त्यातून परावर्तीत होताना दिसते. या लेण्या एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस अगदी योगायोगाने, युध्शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटीश अधिकार्यांना या गुहांचा शोध लागला. भारतीय कला आणि इतिहास याविषयी अधिकाधिक माहिती जाणण्यास उत्सुक असणार्यासाठी अजांठा हे आकर्षणकेंद्र बनले आहे.भारतीय पुरातत्व सवेषणासाठी अजांठा गुांफा संरक्षित केली असुन, जाजागतिक वाराश्यांचा स्मारकांच्या यादीतही तिचा समावेश झाला आहे.

औरांगाबाद शहरापासुन सुमारे ९० किमी अंतरावर, सह्याद्रीच्या टेकडयामध्ये अजिंठा गाव वसले आहे. येथील तीस गुफांनी ब्रवशालकाय घोडयाच्या नालेसारखा आकार धारण केला आहे. यापैकी काही गुफांमध्ये अंतर्गत दालनेही आहेत. अखांड पाषाणातील या गुांफा, केवळ छीन्नी-हातोडीच्या सहाय्याने, त्याचबरोबर बुध्दवादावरील श्रद्धेतून आजण प्रेरणेतुन तनमावण झाल्या. बौध्द भिक्षुकांना राहण्यासाठी आणि अध्ययनाचे काम करण्यासाठी कारागिरांनी येथे चैत्य (दालने) व विहार (वसतीस्थाने) खोदुन काढले.चैयात्मध्ये त्यांची प्रार्थना चालत असे. येथील बहुतेक गुहांच्या भिंतीवर, खांबावर आणि प्रवेशद्वारावर सविस्तर कोरीव काम आढळते. भिंतीवर भलीमोठी भित्तीचित्रेही आहेत. येथील तीस गुहा निर्माण करण्यासाठी सहाशे वषांचा कालखंड खर्ची पडला. तत्कालीन वेशभुषा, केशभुषा, दागदागीने, वस्त्रे, संगीत साधने, चालीरीती आजण स्थापत्यशास्त्राचे तपशीलवार विवेचानेही त्यातून मिळते. भारतीय अभीजात कलेच्या या सांकलनातून एक विशिष्ट शैली निर्माण झाली. बुध्दवादाबरोबरच तिचा हा प्रचार व प्रसार जगाच्या वेगवेगळ्या भागात झाला. अशाच प्रकारची चित्रे श्रीलांकेतील सिगीरीया,अफगाणीस्थानातील बामियान आणि तिबेट, नेपाळ, चीन, जपान येथील मंदिरामध्ये व धार्मिक स्थळामध्ये पहावयास मिळतात.गुहांच्या काळोख्या उदरात इतकी विस्तृत चित्रे आणि बारकाईचे कोरीवकाम करणे तत्कालीन कारागिरांना कसे साध्य झाले असावे असा प्रश्न बहुतेक पर्यटकांना पडतो.दिवसातील काही ठराविक वेळात या गुहा नैसर्गिक सूर्यप्रकाशात उजळुन निघतात, यात याचे गुपीत दडले असावे. शिवाय, गुहांचा अंतर्भाग प्रकाशीत करण्यासाठी,धातूंचे आरसे आणि पांढऱ्या रंगाचे पडदे यांचा वापर झाला असावा असेही मानले जाते.

इथल्या काही गुांफा वैशिठ्यपूर्ण आहेत. २६ क्रमांकाच्या गुांफेत मोठमोठ्या, सुंदर मूती आढळतात; पण त्यातील रंगीत भित्तीचित्रे अपूर्णावस्थेत आहेत. १९ क्रमांकाच्या गुांफेच्या विस्तीर्ण दर्शनी भागात धनुष्याकृती गवाक्षे ओळीने पहायला मिळतात.येथे एक संपूर्ण चैलगृह असुन त्याच्या एका टोकाला उभी बुद्धमूती आहे. येथील बैठी नागराजाची मूती आणि त्याच्या सोबत असलेली स्त्री दासी विशेष नोंद घेण्याजोगी आहे. सोळा क्रमांकाची गुफा हे एक मोठे विहार आहे. तीत गुफा बनब्रवणाऱ्या राजाची आणि मंत्राची नावे कोरली आहेत. उपदेश करण्यात मग्न असलेली विशाल बुद्धमूर्ती येथे पाहता येते. त्याच्या आजुबाजुला चवऱ्या ढाळणाऱ्या दासीही आहेत. १, २, १६ आणि १७ क्रमांकाच्या गुफामधील भित्तीचीत्रांना कोणतीही हानी न पोहोचल्याने तेथील चित्रे सुस्पष्ट व सजीव वाटतात. प्रथम क्रमांकाच्या गुांफेत असलेले विख्यात बोधिसत्त्व पद्मपाणी म्हणजे कोमल दयेचे अदभूत रेखाचित्रण आहे. येथील सुंदर मूर्तीच्या नाजुक हातात कमलपुष्प दिसते. याच गुांफेत अवालोकितेश्वराची सुवर्णमूर्ती पहायला मिळते. ती दागदागिन्यांनी अक्रशः मढलेली आहे. त्यातील जस्त्रया, राजकुमारी, दासी सगळ्याच शोतभवांत असुन त्यांचे पोषाखही कलात्मक आहेत. नृत्यमग्न ललना आजण वादक यांचा सजीव देखावाही येथे आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या गुांफेत राणी माया दहच्या स्वप्नाचा सविस्तर वृत्तान्त चित्रित केला आहे. त्यात शुभ्र हत्ती प्रकषावने उठुन दिसतात. शाही ज्योतिषांनी या स्वप्नाचा संबंध तेजस्वी पुत्राच्या जन्माशी लावल्याचेही कळते. या गुांफेत अनेक बुद्धमूती ओळीने मांडल्या आहेत.

१७ क्रमांकाच्या गुांफेत आकाशात विहार करणारी अप्सरा असुन तिच्या पोषाखावर नाजुक कलाकुसर आजण अंगावर अनेक दागदागीने ददसतात. या गुफापासून काही अंतरावर चालत गेल्यावर घोडयाच्या नालेच्या आकारात एक खिंड दिसते. येथेच नाविण्यापूर्व जलव्यवस्था केली आहे. त्यातून भिक्षुंना आणि त्यांच्या अनुयायांना पाणीपुरवठा होत असावा. अजांठा प्राचीन व्यापारी तटमार्गावर वसलेले असल्याने तेथे बऱ्याच उलाढाली होत असाव्यात आजण बरेच प्रवासीही येथे येत असावेत . त्या काळातील लोकजीवन कसे होते, याची खरेतर कोणालाच कल्पना नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचा अर्थ लावतो. अजिंठ्याविषयी वाटणाऱ्या गूढ आकर्षणाचे कदाचित हे देखील एक कारण असेल

अजिंठा लेणी विषयी महत्वपूर्ण माहिती:
अजिंठा लेणी सकाळी ०९:०० वाजता उघडते व सायंकाळी ०५:३० वाजता बंद होते.
अजिंठा लेणी दर सोमवारी पर्यटकांसाठी बंद असते.
१५ वर्ष वयापर्यंतच्या व्यक्तीसाठी मोफत प्रवेश\
१५ वर्ष वयापुढील भारतीय व्यक्तीला प्रत्येकी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.
लेणी पाहण्यासाठी गाईड लावल्यास १ ते ५ व्यक्तीसाठी ७५०/- रुपये - (४ तासापर्यंत)
६ ते १४ व्यक्तीसाठी ९५०/- रुपये - (४ तासापर्यंत)
१५ ते ४० व्यक्तीसाठी १२६०/- रुपये - (४ तासापर्यंत) दर आहेत.
परवानगीशिवाय लेण्यामधील व लेण्याबाहेरील छायाचित्रणासाठी बंदी आहे.
प्रतिबंधित लेणी परिसरात छायाचित्रणासाठी करण्यासाठी ५०००/- प्रती दिवस शुल्क आकारले
जाते.तसेच छायाचित्रणासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक यांची लेखी पूर्व परवानगी आवश्यक असते.यासाठी १००००/- रुपये एवढी अनामत रक्कम भरावी लागते.
अजिंठा लेणीला जवळचे पोलीस ठाणे ४ कि.मि. अंतरावरील फर्दापूर गाव आहे.
अजीठा लेणीत खाजगी वाहन घेऊन जाण्यासाठी प्रशासनानेबंदी घातलेली आहे. लेणी च्याच
अलीकडेच ४ कि.मि. अंतरावर टी-पॉईट य ठिकाणी खाजगी वाहने थांबवली जातात. येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रदूषण विरहित विशेष बसने प्रवास करावा लागतो. यासाठी साधी बस १५ रुपये तिकीट दर आहे. तर वातानुकुलीत बस साठी २० रुपये तिकीट दर आहे. (शैक्षणीक सहलीसाठी कोणतीही सवलत नाही)
टी-पॉईट या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. य साठी शुल्क आकारले जाते.
टी-पॉईट या ठिकाणी महिला, विद्यार्थी यांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दुकाने उपलब्ध आहे.
टी-पॉईट या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने "अजिंठा पर्यटन केंद्र" स्थापन केलेले
आहे. य ठिकाणी अजिंठा लेणी येथील काही लेण्यांची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. येथे लेण्याच्या इतिहासापासून शोधापर्यंतची माहिती ध्वनिचीत्रफितीच्या माध्यमातून दाखवली जाते.य ठिकाणी मुंबईच्या नेहेरू तारांगनाप्रमाणे प्रोजेक्टरच्या सहाय्याने लेण्यांचा इतिहास ध्वनीचित्र स्वरुपात दाखविला जातो.
सध्या अजिंठा पर्यटन केंद्र येथे कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

अजिंठा लेणीतील इतर माहितीसाठी संपर्क:

९३२५७१८५००
०२४३५-२४४२२७

अजिंठा लेणी सप्तकुंड धबधबा :-

   वेताळवाडी किल्ला:

 

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुची व यावरील इमारती आदी शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परिपूर्ण किल्ला पाहिल्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.

वेताळगड किल्ल्याच्या एक बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मागाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुची आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या या दोन बुरूजापेक्षा उंच व भव्य बुरुची आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजापर्यंत पोहचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुबुरुचीची रचना केलेली आहे. दोन बुरुचीमधून फरसबंदी केलेली वाटकाटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेश्द्याराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला "जंजाळा दरवाजा" म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फुट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर दरवाज्याच्या छतावर एक चौकोणी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जिना आपयाला एक मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाज्यावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सवाफत खाली वेताळवाडी धरण पहायला ममळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.

प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाज्यापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुचात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुचीपाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्ह्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुचीजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुचापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुचीवरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळतात. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्यावर नमाजगीरर नावाची इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.

किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानीच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोक्कांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवमगरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.

किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फुट १० इंच लांबीची तोफ पडलेली आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुचीत बसवलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फुट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकार्यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले कि आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.

कसे याल :- औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात येण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.

मंदिर
येथील वातावरण
परिसरातील प्रेक्षणीय स्थळे
परिसरातील धार्मिक स्थळे
अजिंठ्याहून महत्वाच्या ठिकाणाची अंतरे
 
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते

 

माहिती http://www.trekshitiz.com या संकेतस्थळावरून साभार.

छायाचित्र http://www.onkaroak.com या संकेतस्थळावरून साभार.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळाचा वापर करावा.