या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे लपलेली आहेत. नैसर्गिक सौदर्याने नटलेली
डोंगरे, लेण्या आणि ऐतिहासिक महत्व असलेली अनेक ठिकाणे परीसरामद्धे पाहायला
मिळतात.
श्री क्षेत्र जाळीचा देव:-
जाळीचा
देव (जि. जालना) - अजिंठ्यापासून 28 किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव'
हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी
बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून
कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी
सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट
अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले . त्या ठिकाणी यांना दोन
वाघिणीचे पिल्ले दिसले. त्यांनी त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना
प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली .
स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव मांजरासारखी स्वामींकडे पाहून
शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेल्लिनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले
असताना घडली. म्हणून या तीथथक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले. वाघोदा (जि. जळगाव)
येथील भक्त (कै.) लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला व्हावा यासाठी 1936 मध्ये
येथे आले. त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवसी
पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले. व म्हणाले तु मला सावली कर , मी तुझा
रोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. स्वप्नात
परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडूपे
काढून 1938 मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या
बादशाहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते.
तेव्हा (कै.) श्री. पाटील व तेथील पुजारी (कै.) दत्तूबुवा हैदराबादला जाऊन
बांधकामाची परवानगी घेऊन आले. 1942 मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण
समारंभ थाटात झाला.
रुद्रेश्वर महादेव व गणेश लेणी:
 
अवघ्या विश्वाला
अजिंठ्याच्या चीत्राशिल्प्पानी मोहिनी घातली आहे . परंतु या लेणीच्या मागील बाजूस
असलेली ३ हजार वर्षे पूर्व पुरातन गणेश लेणी (रुद्रेश्वर) हि कला व निसर्गसौदर्याची
खान तीर्थास्तालाचा दर्जा मिळूनही अजून अंधारातच आहे. सोयगावच्या दक्षिणेस पाच
किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत हे महादेव मंदिर व गणेश लेणी आहे. शहरापासून
गल्वाडा व वेताल्वादी मार्गाने गणेश लेणीच्या पायाथ्यापार्य्नात जाता येते.
गणेश लेणीत प्रवेश करतच मोठे
सभामंडप येते. साधारणतः ४० ते ५० फुट लांब व १२ फुट उंच सभामंडप आहे.भिंतीवर ४ फुट
उंचीवर मंगलमुर्ती आहे . मूर्ती भव्य व प्रसन्न मुद्रेतील आहे. मूर्ती डाव्या
सोंडेची व ५ बाय ५ फुटांची आहे. या मूर्तीच्या मागील भुयार अजिंठा लेणीत प्रवेश
करते असे सांगतात उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नाताराजाचे शिल्प तीन
फुट उंचीच्या आकारात कोरलेले आहे. अंगारिका व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी
दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. पर्वताच्या मधोमध कोरलेल्या या गणेश लेणीत एक
प्रशष्ट दगडी बैठकीवर महादेवाची पिंड आहे. तसेच पिंडीसमोर भव्य आकाराचा नंदी आहे.
लेणीच्या वरच्या भागापासून दुधासारखी शुब्घ्र धार पडते. या लेणीच्या तळाशी एक
चोतेशे तीर्थकुंड आहे या तीर्थकुंडात धबधब्याचे पाणी पडते. हे पाणी पुढे वाघुर
नदीला जाऊन मिळते. हे वाघुर नदीचे उगमस्थाना आहे. सिद्धिविनायकाचे हे जागृत
देवस्थान समजले जातात.