Skip Navigation Links

श्रीराम मंदिराची माहिती


जागतिक पर्यटन स्थळ म्हणून "अजिंठा लेणी" हे नाव जगाला नवीन नाही. अजिंठा गावाच्या नावाहुनच लेण्यांना "अजिंठा लेणी" असे संबोधले जाते . तसे बघितल्यास ह्या लेण्या अजिंठा डोंगर रांगात अजिंठ्यापासून ८ कि. मी. अंतरावर डोंगरात कोरल्या आहेत. काही ऐतिहासिक पुरावे चाळले असता या गावास हजारो वर्षाची परंपरा असून त्यास ओसाका, राजतांग, नासिका, तियागुरा , रांजणी, अचित्या, ओसाका, अंचिता, अजंता, अजिंठा अश्या नावाचा संबोधल्या गेलेच्या उल्लेख आढळतो.

मात्र इंग्रज राजवटीत या गावास इंग्रज इंग्रजी भाषेत लिहिताना "AJANTA" म्हणजेच अजंता असा उल्लेख करायचे तर मराठी भाषिक "अजिंठा" असा करायचे. हजारो वर्षापूर्वीचा अजिंठा लेण्याचा इतिहास पाहता गावही तेवढेच ऐतिहासिक असून गावास चोहोबाजूंनी निजामकालीन दगडी भिंतींची मजबूत तटबंदी आहे. या तटबंदीस जुने विशालकाय लाकडी दरवाजे आहेत. गावात अष्टकोणी आकाराची भव्य सराय, पुरातन बारादरी पाणी पुरवठा करणाऱ्या बारवं, मजबूत असा दगडी पूल इंग्रज अधिकारी रॉबर्ट गिल याची प्रियसी पारो हिची कबर ,करोडगिरी , शनि महाराज मठ , बालाजी मंदिर, तसेच ऐतिहासिक श्री राम मंदिर हि गावाची वैशिष्टे म्हणावी लागतील.

या पैकीच एक म्हणजे श्री राम मंदिर.... गावातील जुन्या जानकार लोकांकडून मंदिराविषयी २५० वर्षापासूनची माहिती उपलब्ध होते .इ. स. १८९० साली जामनेर चे सराफ व्यापारी वामन गणेश साठे हे अजिंठ्यात व्यावसायिक हेतूने स्थायिक झाले त्यांनी अजिंठ्यात इ. स. १८९४ साली जिनिंग फँक्टरी सुरु केली.त्याच वर्षापासून त्यांनी एका शेतात असलेल्या या छोट्याश्या मंदिराची देखभाल करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांचे चिरंजीव प्रभाकर वामन साठे यांनी .इ. स. १९३२ ते १९३४ च्या दरम्यान या छोट्याश्या पुरातन श्री राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले.आज अस्तित्वात असलेले हे मंदिर हे त्या काळचेच असून मंदिराचे बांधकाम रामसिंग मिस्त्री तसेच मंदिरातील लाकडी सुतार काम धोंडू मिस्त्री यांनी केल्याचा उल्लेख साठे कुटुंबाजवळ असलेल्या लेखी दस्ताऐवाजात आढळतो. त्या काळी सदर श्री राम मंदिराची जमीन मंदिराचे पूजा व पौरोहित्य करणारे नारायण बळवंतराव जोशी यांचे नावे होती.नंतर त्यांनी ती श्री राम मंदिर संस्थानास अर्पण केली.नारायण जोशी यांच्या नंतर मंदिराची पूजा व पौराहित्य करण्याचे कार्य इ. स. १९७० नंतर दत्तात्रय देविदास भंडारे यांनी केली.त्यांच्या पाश्च्यात हे कार्य त्यांचे चिरंजीव गजानन मुरलीधर भंडारे हे आजतयागत श्री राम मंदिरात निस्वार्थपणे पूजा व पौराहित्य करीत आहे. श्री राम मंदिर परिसरात श्री दुर्गा देवी मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, आदी तीन ते चार मंदिर आहेत. दरवर्षी श्रीराम नवमीस संस्थाकडून मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात साठे कुटुंबियांकडून मागील १०० वर्षापासून श्री रामास वस्त्र अलंकार चढविले जातात. श्रीराम नवमी व्यतिरिक्त मंदिरात संस्थानकडून अनेक उत्सव वर्षभर साजरे केले जातात.
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात.
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते.


 
   मंदिर



श्री राम मंदिर संस्थांन अजिंठा पैकी जुने श्री रामाचे मंदिर हे पुरातन असून जुन्या पिढीतील २५० वर्षापूर्वीपर्यंत लोकांना त्याबद्दल माहिती असून हे जुने व छोटे मंदिर त्याच्या अगोदर पासून अस्तित्वात आहे . पुढे या मंदिराच्या पाठीमाघे शेत असलेल्या एका भाविकाने हे शेत एका पूजा वगरे करणाऱ्या पुढे वाचा
   अजिंठा लेणी परिसर



महाराष्ट्रातील प्राचीन शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. अजिंठा हा गाव लेण्यांजवळ ६ किमी. च्या आत डोंगरमाथ्यावर असल्यामुळे इंग्रज लेखकांच्या लेखांत यांचा उल्लेख  पुढे वाचा
 
Website Visitors